स्वप्न
स्वप्नांशी भांडावे कि
त्यांच्या पुर्णत्वाशी सम्पुर्ण समरस होऊन स्वत्वाचा त्याग करावा...
किंवा चारचौघांसारखे आपणही चारचौघ
होऊन जाव, स्वप्नांना उराशी बाळगुन!
प्रयत्न कमी पडतो कि माणुस कि
दोघही कि परिस्थीती, अजुनही ह्या गुढ प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही. कदाचित्
त्याही पेकक़्शा कोणितरी वेगळे कमी पडत
असेल.. नाहीतर भरपुर पाऊस पडुनही तळी, धरण, नद्या तुडुम्ब भरुनही शेवटी कोकिळेचा
घसा कोरडा तो कोरडाच! खर ना!
कोणितरी खरच खुप छान
म्हटलय, एक पाऊल मागे घेता येणार असेल तरच दोन पावल उडी मारायला हरकत नाही. पण उडी
मारल्या नंतर शेळपटासारखे मागे फिरणे ढाण्या वाघाला शोभुन दिसेल का?
कि तो सुद्धा मोठी उडी
मारण्यासाठी दोन पावल मागे येईल, माहीत नाही.
प्रश्न खुप असतात,
प्रवासाच्या मार्गावर पण...उत्तरार्ध सुखाचा झाला पाहिजे!
Comments