Skip to main content
रंग
__________________________________
रंगांच्या नाना तऱ्हा मी पहिल्या,
रंग ओळखीचा एक ना गर्दीत होता..

जरा विसावयास मी पाठ ठेवलीच होती,
इतक्यात मिठी खुली तुझ्या अश्रूंची झाली..

जगण्यात रस ना त्या विद्द्युलतेस होता,
ती एकटीच येते आश्वस्थ धरेसाठी...

एक कस्तुरी सुगंध भरात होता,
पण मी धावलो कातडी सांभाळण्यासाठी..

मी झेलणाऱ्या पावसाला ना रागावले,
माझ्याच सावल्यांनी कित्येक वार केले..

-गिरिजाकांत
________________________________________

Comments

Popular posts from this blog

मी. .............. ती ____________________________________ मी  आळविता राग, ती  कोसळती मेघधारा मी एकटा  मंदार, ती चंचल ऊनाड वारा   मी ओझरता स्पर्श, ती चाहुल श्रृंगारची  मी रंग दिशेचा,  ती  भूल दिशेची  मी लाजरा प्रणय ती तरल कामयानी  मी नाजुक हाक, ती आर्त हृदयध्वनि मी कोवाळा  मदन, ती  धुंद रती  मी मंद सुगंध, ती प्रकाश वाती   मी  शुभ्र पहाट, ती आरक्त संध्या  मी तप्त ऋतु, ती शीतल छाया  मी संथ भैरवी, ती ओठावरची गाणी मी 'प्रेम-वेडा ;, , ती  'प्रेम -विराणी '
मद्यराजा _______________________________________ मी मद्य प्यालो जरासे अन झिंग चढली उराशी  हृदयात जळजळणारी आग भिडली नभाशी  नाकारले जगाने मी मद्यपी म्हणोनि  स्वीकारले सारे ते बंधमुक्त स्वरांनी जुगारात मद्यपानाच्या हरलो प्यालानी   अन्य तारे उजळले मोहांच्या क्षणांनी  मि त्यात नव्हतो माझी मिठी मद्यपत्राशी  मद्य प्यालो जरासे अन झिंग चढली उराशी II १ II  एक दिवस यावा  मि मद्य होऊनी जावे  सावधानी जगाने बेभानी मज प्राषावे  मज पाहता अवधानी गर्जुनी फूल उधळावे कवटाळून मजाला  'मद्यराजा ' म्हणावे अग्नि शय्येशी शांत निजावे प्रभु धरेशी अन, मद्य प्यालो जरासे अन झिंग चढली उराशी  II २   II हृदयात जळजळणारी आग भिडली नभाशी  ____________________________________________ - गिरिजाकांत