मद्यराजा
_______________________________________
मी मद्य प्यालो जरासे अन झिंग चढली उराशी
हृदयात जळजळणारी आग भिडली नभाशी
नाकारले जगाने मी मद्यपी म्हणोनि
स्वीकारले सारे ते बंधमुक्त स्वरांनी
जुगारात मद्यपानाच्या हरलो प्यालानी
अन्य तारे उजळले मोहांच्या क्षणांनी
मि त्यात नव्हतो माझी मिठी मद्यपत्राशी
मद्य प्यालो जरासे अन झिंग चढली उराशी II १ II
एक दिवस यावा मि मद्य होऊनी जावे
सावधानी जगाने बेभानी मज प्राषावे
मज पाहता अवधानी गर्जुनी फूल उधळावे
कवटाळून मजाला 'मद्यराजा ' म्हणावे
अग्नि शय्येशी शांत निजावे प्रभु धरेशी
अन, मद्य प्यालो जरासे अन झिंग चढली उराशी II २ II
हृदयात जळजळणारी आग भिडली नभाशी
____________________________________________
-गिरिजाकांत
_______________________________________
मी मद्य प्यालो जरासे अन झिंग चढली उराशी
हृदयात जळजळणारी आग भिडली नभाशी
नाकारले जगाने मी मद्यपी म्हणोनि
स्वीकारले सारे ते बंधमुक्त स्वरांनी
जुगारात मद्यपानाच्या हरलो प्यालानी
अन्य तारे उजळले मोहांच्या क्षणांनी
मि त्यात नव्हतो माझी मिठी मद्यपत्राशी
मद्य प्यालो जरासे अन झिंग चढली उराशी II १ II
एक दिवस यावा मि मद्य होऊनी जावे
सावधानी जगाने बेभानी मज प्राषावे
मज पाहता अवधानी गर्जुनी फूल उधळावे
कवटाळून मजाला 'मद्यराजा ' म्हणावे
अग्नि शय्येशी शांत निजावे प्रभु धरेशी
अन, मद्य प्यालो जरासे अन झिंग चढली उराशी II २ II
हृदयात जळजळणारी आग भिडली नभाशी
____________________________________________
-गिरिजाकांत
Comments