रंग __________________________________ रंगांच्या नाना तऱ्हा मी पहिल्या, रंग ओळखीचा एक ना गर्दीत होता.. जरा विसावयास मी पाठ ठेवलीच होती, इतक्यात मिठी खुली तुझ्या अश्रूंची झाली.. जगण्यात रस ना त्या विद्द्युलतेस होता, ती एकटीच येते आश्वस्थ धरेसाठी... एक कस्तुरी सुगंध भरात होता, पण मी धावलो कातडी सांभाळण्यासाठी.. मी झेलणाऱ्या पावसाला ना रागावले, माझ्याच सावल्यांनी कित्येक वार केले.. -गिरिजाकांत ________________________________________
Poet, writer, Photographer & Freelancer Journalist