मी. .............. ती ____________________________________ मी आळविता राग, ती कोसळती मेघधारा मी एकटा मंदार, ती चंचल ऊनाड वारा मी ओझरता स्पर्श, ती चाहुल श्रृंगारची मी रंग दिशेचा, ती भूल दिशेची मी लाजरा प्रणय ती तरल कामयानी मी नाजुक हाक, ती आर्त हृदयध्वनि मी कोवाळा मदन, ती धुंद रती मी मंद सुगंध, ती प्रकाश वाती मी शुभ्र पहाट, ती आरक्त संध्या मी तप्त ऋतु, ती शीतल छाया मी संथ भैरवी, ती ओठावरची गाणी मी 'प्रेम-वेडा ;, , ती 'प्रेम -विराणी '
Comments